आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे नाही, तर हिंदूंचे राजे आहेत. त्यामुळे प्रांतवाद व जातीयवाद सोडा आणि हिंदू म्हणून एकत्र या. लव्ह जिहादविरोधी कायदा फक्त आंदोलने करून होणार नाही, असे प्रतिपादन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी केले. लव्ह जिहाद व सक्तीचे धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाद्वारे हजारोंच्या उपस्थितीत हिंदू जनआक्रोश मोर्चा बुधवारी काढण्यात आला.
कालीचरण महाराज म्हणाले, एकटे मोदी, शहा, योगी काही करू शकणार नाहीत. कट्टर हिंदुत्ववादी राज्यकर्ते आपापल्या भागातून पाठवा. ५ वर्षांतून एकदा एकजूट दाखवून शंभर टक्के मतदान करा. राजकारणाचे हिंदुकरण करा. ३७० कलम जसे हटवले, तसाच लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदू राष्ट्राची गरज आहे. हिंदुत्वासाठी मतदान केले, तरच देशात हिंदू राष्ट्राची स्थापना होईल. भगवे उपरणे परिधान केलेल्या उपस्थितांकडून जय भवानी जय शिवराय, जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.