आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मढीतील गाढवाचा बाजार महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध:श्री क्षेत्र मढीत कानिफनाथांच्या यात्रेला सुरुवात; राज्यासह परराज्यातून येतात भाविक

अहमदनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी येथे सोमवार (6 मार्च) ला होळीच्या सणापासून कानिफनाथांच्या यात्रेस प्रारंभ झाला आहे. होळीपासून सुरू झालेला यात्रोत्सव पंधरा दिवस चालणार असून, कानिफनाथांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने मढी येथे दाखल झाले होते. या यात्रोत्सवासाठी महाराष्ट्रासह,गुजरात,आंध्रप्रदेश,तामिळनाडू राज्यातून येतात यात्रेसाठी भाविक येतात. विशेष म्हणजे यात्रोत्सवा दरम्यान भरणारा गाढवांचा बाजार महाराष्ट्रसह देशात प्रसिद्ध आहे.

अठरा पगड समाजाबरोबर कैकाडी समाजाला काठीचा मान दिला असून, त्या समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला लागल्यानतर यात्रेचा डफ वाजतो त्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात होते.

कोरोनानंतर दोन वर्षांनी श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. रविवार (12 मार्च) ला रंगपंचमीच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. होळी ते गुढीपाडवा अशा पंधरा दिवसांच्या कालावधीत हा यात्रोत्सव भरणार आहे.

यात्रेनिमित्त मढीत अहमदनगरसह पुणे, सोलापूर औरंगाबाद या जिल्ह्यातून हॉटेल व्यवसासायिक दोन दिवसापासून दाखल होत आहेत. लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने, रहाटपाळणे, प्रसाद, खेळणीची दुकाने थाटण्यात आली आहेत.

मढी देवस्थाने 18 ते 21 मार्च या कालावधीत चार दिवस अगोदर समाधी मंदिर दर्शनासाठी खुले ठेवले जाणार आहे त्यामुळे भाविकांना थेट गाभाऱ्यात दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. असे देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड यांनी सांगितले. मढी यात्रेतील गाढवाचा बाजार हा देशभरात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह भारतभरातून गाढव खरेदीसाठी लोक येत असतात.

सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वीची मानाची पंरपरा जपत राज्यातील कैकाडी समाज बांधवांनी सोमवारी मढी येथे वाजत गाजत येऊन कानिफनाथांच्या समाधी मंदिराच्या कळसाला मानाची काठी टेकविली. त्यानंतर यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी मढी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मरकड सह पदाधिकारी उपस्थित होते.

मढी गडाची ख्याती, गडाचा राजकारण्याने विकास केला म्हणून आजही गडाला किल्ल्याचे स्वरूप

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज यांची कानिफनाथांवर श्रद्धा होती. कानिफनाथांच्या गडाचा त्यांच्या कालावधीत विकास झाला होता. राजघराण्याने विकास केल्यामुळे आजही मढीचा गड हा संपूर्ण किल्ल्यासारखा दिसतो. विशेष म्हणजे राजघराण्याने या मढीच्या यात्रेत भटक्या समाजाला विविध स्वरूपात मानपान दिल्याची आख्यायिका आहे.

बातम्या आणखी आहेत...