आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांनी गर्दी:कानिफनाथांचा प्रकट दिन पारंपरिक पध्दतीने साजरा

पाथर्डी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री क्षेत्रमढी येथे कानिफनाथांचा प्रकट दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. कानिफनाथांचा जयजयकार करत नाथांच्या संजीवन समाधी व पादुकांची महापुजा करून नाथ भक्तांनी कानिफनाथांचा जन्मोत्सव साजरा केला.

चैतन्य कानिफनाथांनी श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी अवतार घेतला. रंगपंचमी, सर्व श्रावणी शुक्रवार, अमावस्या, व पौर्णिमा या दिवशी राज्यभरातून नाथ भक्त येथे दर्शनासाठी येतात. देवस्थान समिती व भाविकांच्या उपस्थितीत सकाळी जन्मोत्सवास प्रारंभ झाला. नवनाथ ग्रंथातील अवतार प्रकट होण्याच्या अध्यायाचे वाचन करण्यात आले.

स्थानिक महिला भजनी मंडळाच्या सदस्यांनी जन्माचा पाळण्याचे गायण करत विविध मान्यवरांच्या हस्ते पाळणा हलवण्यात आला. यावेळी अशोक महाराज मरकड, देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, श्यामराव मरकड, माजी सरपंच बाबासाहेब मरकड, लक्ष्मण महाराज मरकड, शरद कुटे उपस्थित होते. नाथ भक्त व भजनी मंडळाच्या उपस्थितीत नाथांच्या पादुकाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. फटाक्याची आतषबाजी ढोल ताशांचा निनादाने परिसर दुमदुमुन गेला होता. मंदिरात दिवसभर भक्तांची वर्दळ होती.ओम चैतन्य अन्नपूर्णा अन्नछत्र राहुरी या मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे दिवसभर वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...