आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कानवडे

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ संलग्न अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आंबड येथील रहिवासी शिक्षक नेते भास्कर कानवडे यांची निवड झाली. जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा संघाचे माजी सचिव शिवाजी ढाळे, आबासाहेब कोकाटे, निष्ठावंत सेवानिवृत्त शिक्षकांसह प्रमुख नेतेगण उपस्थित होते.

सभेत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात नवी जिल्हा कार्यकारिणीची निवडण्यात आली. सभेस अकोल्यातील संचालक भास्कर कानवडे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड झाली. या माध्यमातून अकोले तालुक्याला महत्त्वाचे पद मिळाल्याने काम करण्यास मोठी संधी मिळाल्याचे बोलले जाते. अहमदनगर शिक्षक सोसायटीचे संचालक अण्णासाहेब ढगे, अनिल गायकर, सुनील वाळुंज, अनिल चासकर, सतीश पाचपुते, जगन मुतडक आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...