आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:कराटे म्हणजे आत्मरक्षणाचे धडे; पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी केले प्रतिपादन

संगमनेर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात खेळाला खूप महत्त्व आहे. आवडत्या खेळात झोकून देत नैपूण्य प्राप्त केल्यास हवे ते मिळवता येते. पोलिस दलात माझी सेवा खेळातून सुरू झाली. समाजात वाढलेल्या अपप्रवृत्ती लक्षात घेता मुलींनी कराटेचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. छेडछाडीच्या घटना वेळीच पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यास गुन्हेगारीवर अंकुश ठेवता येईल. कराटे म्हणजे आत्मरक्षणाचे धडे असल्याचे प्रतिपादन पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी केले.

गीता परिवाराच्या कराटे प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांचे ब्लॅक बेल्ट परीक्षेतील यश व पुणे येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मिळविलेल्या पदकांनिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात मदने बोलत होते. गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, विष्णु तवरेज, दत्ता भांदुर्गे व प्रमोद मेहेत्रे व पालक उपस्थित होते. एप्रिलमध्ये कराटेच्या ब्लॅक बेल्टसाठी परीक्षा घेण्यात आल्या, त्यात गीता परिवाराच्या २१ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

तर महाराष्ट्र दिनी पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत १२ सुवर्ण, १४ रौप्य व १२ कांस्य पदकांची कमाई केली. ओकिनावा मार्शल आर्टस अकादमीने प्रशस्ती पत्रक देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला. डॉ. मालपाणी म्हणाले, गीता परिवाराचे २९ वर्षांपासून कराटे प्रशिक्षणाचे काम अव्याहत सुरू आहे. मुलांनी दररोज किमान एक तास मैदानावर खेळलेच पाहिजे. कराटे प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आनंददायी असल्याचे ते म्हणाले. दत्ता भांदुर्गे यांनी प्रास्तविक केले. सचिन पलोड यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद मेहेत्रे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...