आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मवीर काळे कारखाना पहिला हफ्ता 2500 रुपये देणार:आमदार आशुतोष काळे यांनी केले जाहीर

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तीन गळीत हंगामापासून जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याची परंपरा याहीवर्षी कायम ठेवून २०२२-२३ च्या गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला पहिला हफ्ता २५०० रुपये देणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ या वर्षाच्या ६८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक, मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व त्यांच्या पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार आशुतोष काळे बोलत होते. आमदरा आशुतोष काळे म्हणाले, इस्माने चालू हंगामात देशामध्ये ४१० लाख मे.टन साखर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करून त्यापैकी इथेनॉल उत्पादनासाठी ४५ लाख टन साखरेचा वापर होऊन साखरेचे निव्वळ उत्पादन ३६५ लाख मे.टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात एकूण १४.८७ लाख हेक्टर ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध असून मागील हंगामात १३७ लाख मे. टन साखर उत्पादन झाले असून चालू हंगामात देखील १३८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. मात्र मागील तीन महिने ऊस पिकाच्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषणाचे ऊसाच्या मुळाचे कार्य मंदावले आहे.

बातम्या आणखी आहेत...