आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:कातोरे, गलांडे बाळासाहेबांच्या शिवसेनेत

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व स्वराज्य कामगार सेनेचे योगेश गलांडे यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. कातोरे यांना काही महिन्यांपूर्वीच उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत युवा सेना जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आता ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात उडी घेतली आहे.

प्रवेशावेळी शिवसेनेचे सचिव संजय मोरे, नगर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, नंदू ताडे आडी उपस्थित होते. याप्रसंगी आकाश कातोरे यांच्यावर बाळासाहेबांची शिवसेना युवा सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. तर योगेश गलांडे यांची युवा सेनेच्या शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे काम सुरु आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. खा. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेची चांगल्या पद्धतीने वाटचाल सुरु आहे. शिवसैनिकांना सन्मान देण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून करण्यात आहे. त्यामुळे अनेक लोक पक्षाशी जोडले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...