आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुर्वेद कॉर्नर ते आगरकर मळा या काटवन खंडोबा रस्त्याच्या कामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व काँक्रीटीकरण, तसेच पुलाच्या कामासाठी सुमारे साडेआठ कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर झाला आहे. या कामाच्या प्रशासकीय मान्यतेमधील अडथळा दूर झाला असून, लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, साडेसहा कोटी रुपयांच्या कानडे मळा परिसरातील रस्त्याच्या कामालाही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आमदार जगताप यांच्या पाठपुराव्याला यश येऊन १४.९२ कोटी रुपयांची कामे येत्या काळात मार्गी लागणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काटवन खंडोबा रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.
नगर शहर ते आगरकर मळा परिसराला जोडणारा हा प्रमुख पर्यायी रस्ता आहे. आमदार जगताप यांनी पाठपुरावा करून काटवन खंडोबा रस्त्याच्या कामासाठी व या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी सुमारे साडेआठ कोटींचा निधी उपलब्ध करुन घेतला होता. मात्र, प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने काम रखडले होते. आता या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या रस्त्याच्या कामामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. दरम्यान, सोलापूर रोड व कोंबडीवाला मळा परिसरातील मुख्य रस्त्यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्याचीही प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. नगर शहर ते आगरकर मळा परिसराला जोडणाऱ्या काटवन खंडोबा रस्त्याची सध्याची परिस्थिती.
राजकीय विरोधामुळे चार महिने विलंबविकासकामांत राजकीय खोडा घातला जात असल्याने अनेक कामे रखडतात. या दोन्ही रस्त्यांच्या कामांना पाच ते सहा महिन्यांपूर्वीच निधी उपलब्ध झाला होता. मात्र, राजकीय हस्तक्षेप व विरोधामुळे प्रशासकीय मान्यता मिळण्यास चार महिने विलंब झाला. आता या कामांना मान्यता मिळाली अाहे. लवकरच ती मार्गी लागतील. - संग्राम जगताप, आमदार, नगर शहर
पर्यायी रस्ते विकसित होणारहॉटेल कॅफे फरहत ते कानडे मळा रस्ता व सीताबन लॉन रस्ता काँक्रिटीकरणास निधी मंजूर झाला आहे. यापूर्वी कानडे मळा परिसरातील रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी मंजूर आहेत. या दोन्ही कामामुळे सोलापूर महामार्ग व पुणे महामार्गाला जोडणारा पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. सारसनगर व कानडे मळा, कोंबडीवाला मळा परिरसातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.