आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. गुरुवारी (२ मार्च) होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे. दरम्यान, महापालिका अस्तित्वात आल्यानंतरचे ते १८ वे सभापती ठरणार आहेत. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी सदस्य निवडीच्या सभेत सभापती पदासह सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता.
त्यामुळे हे पद रिक्त होते. विभागीय आयुक्तांनी २ मार्च रोजी निवडणूक जाहीर केली. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सभापतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारीअर्ज भरण्यासाठी बुधवारी अखेरची मुदत होती. या मुदतीत महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना नगरसेवक कवडे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आली आहे.
त्यामुळे कवडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. स्थायी समितीच्या सभेत निवडणूक प्रक्रिया होऊन कवडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे. कवडे हे १८ वे सभापती ठरणार असून, वर्षाअखेरीस होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. दरम्यान, सभापती निवडीनंतर आता सभागृहनेताही बदलला जाण्याची शक्यता आहे. हे पद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाणार असून, या पदावर विनीत पाऊलबुधे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.