आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येकाने दररोज एक तास अभ्यास केल्यास चांगले विद्यार्थी घडतील. पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे. मोबाईलमुळे अनेक मुलांना चष्मे लागत आहेत. मुले खेळापासून दूर होत आहेत. प्रत्येकाने दररोज एक तास तरी खेळावे. विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवल्यास त्यांची शैक्षणिक प्रगती होईल, असे प्रतिपादन प्रेमराज सारडा महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी केले. दादा चौधरी मराठी शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बाेलत हाेते.
याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, जिल्हा परिषदेच्या प्र. उपशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, मुख्याध्यापक मधुकर साबळे, यांच्यासह अजित बोरा, सुमतीलाल कोठारी, शालेय समिती सदस्य जयकुमार रंगलानी, विजय कोठारी, मुख्याध्यापक सुभाष येवले व पालक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रभारी उपशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले म्हणाल्या, दहा वर्षात शाळेच्या प्रगतीत आमुलाग्र बदल झाला आहे. शाळेची इयत्ता पहिली ते चाैथीची पटसंख्या वाढ होण्याचे कारण म्हणजे हिंद सेवा मंडळाचे शाळेकडे असणारे लक्ष आहे. मुलांची चौकस वृत्ती सर्जनशीलता या छोट्या गोष्टींमधून होत असते. शाळेत पहिलीपासूनच संगणक शिकविण्यासाठी स्वतंत्र शिक्षक आहेत. यावेळी शिरीष मोडक मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुमतीलाल कोठारी, उपक्रमांची माहिती मुख्याध्यापक सुभाष येवले यांनी दिली. सूत्रसंचालन शितल पवार व दिलीप परसपाटकी यांनी केले. तर आभार प्रिया अहिरे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.