आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:अडचणींवर मात करत काम करत रहा, युवक काँग्रेसच्या महासचिव ससाणे यांचे प्रतिपादन

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीसंत सावता माळी संघातर्फे सत्कार

सार्वजनिक जीवनात काम करतांना अनेक अडचणी येत असतात, अशाही परिस्थितीत आपण आपले काम करत राहिले पाहिजे. एक चांगला समाज निर्मितीसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, समाजसेवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष असल्याने पक्षातर्फे सावता माळी युवक संघासमवेत सामाजिक उपक्रम राबवू, असे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या महासचिव दीपाली ससाणे यांनी केले.

युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिवपदी ससाणे यांची निवड झाल्याबद्दल श्री संत सावता माळी युवक संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, संगिता कपाळे, सावता माळी युवक संघाचे जिल्हा अध्यक्ष अशोक तुपे, अनिता तुपे आदी उपस्थित होते.

अशोक तुपे म्हणाले, दीपाली ससाणे यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवकांचे चांगल्या प्रकारे संघटन केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्या सक्षमपणे पार पाडतील. यावेळी शिवाजीराव कपाळे यांनीही ससाणे यांच्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. आभार अनिता तुपे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...