आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामखेड:खर्डा किल्ल्यावर 74 मी. उंच स्वराज्य ध्वजारोहण, संत-महंताच्या उपस्थितीत उभा राहिला स्वराज्य ध्वज

जामखेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतील विक्रमी ७४ मीटर उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाचा भव्य आणि दिमाखदार प्रतिष्ठापना सोहळा जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर झाला. शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे यांच्या हस्ते स्वराज्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

खर्डा भुईकोट किल्ल्यासमोरच्या पटांगणात हा रंगतदार सोहळा सजला. या वेळी रोहित पवार म्हणाले, मी भगव्या रंगाचं राजकारण होऊ देणार नाही. नवीन वस्तूचे आपण पूजन करतो. त्याचप्रमाणे स्वराज्य ध्वजाचेही आज आपण पूजन केले.

बातम्या आणखी आहेत...