आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Kharif Sowing On 6.68 Lakh Hectares In The District This Year; If You Have Any Complaint Regarding Fertilizers And Seeds, Please Contact Department Of Agriculture

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी:जिल्ह्यात यंदा 6.68 लाख हेक्टरवर खरीप पेरणी; खते, बियाण्यांबाबत तक्रारी असल्यास संपर्क साधा- कृषी विभाग

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेत अडचणी उद्भवल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात 6 लाख 68 हजार 535 हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्‍यानुसार कृषी विभागाने तयारी केली. खरिपासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची व बियाणांची उपलब्धता केली आहे. नगर जिल्ह्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र 4 लाख 47 हजार 903 हेक्टर आहे. परंतु सरासरीच्या तुलनेत अधिक म्हणजे 6 लाख 68 हजार हेक्टरच्यावर खरिपाची पेरणी होणार आहे.

यामध्ये कापूस 1 लाख 28 हजार 137 हेक्टर, सोयाबीन 1 लाख 24 हजार 804 हेक्टर, तुरीची पेरणी 68 हजार 445 हेक्टरवर, मूग 57 हजार 913 हेक्टर, उडीद 83 हजार 401 हेक्टर, मका 71 हजार 888 हेक्टर, तर भाताचे पीक 18 हजार 808 हेक्टरवर असेल. बाजरी पिकाच्या क्षेत्रात घट होणार असून 93 हजार 542 हेक्‍टरवर बाजरीची पेरणी होईल. मागील खरिपात 1 लाख 3 हजार 32 हेक्‍टरवर बाजरीची पेरणी झाली होती.

नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीची कामे उरकली असून ते आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. बियाणे व खतांच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

येथे साधा संपर्क

शेतकऱ्यांनी खते व बियाणे संदर्भात आपल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 9890607489 या भ्रमणध्वनी क्रमांकावर व जिल्हा परिषदेतील 7588178842 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...