आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटका:शेकटे बुद्रुक येथील अपहृत तरुणाची 24 तासांत सुटका

शेवगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील अपहरण झालेल्या तरुणाची शेवगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात सुटका केली. शेकटे बुद्रुक येथील सोनाजी छबुराव बोरुडे या (वय ३०) युवकाचे शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावरील बालमटाकळी शिवारातील जिनिंग प्रेसिंगच्या जवळून चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी कारमध्ये बळजबरीने बसवून त्याचे गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अपहरण केले. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे जोरात फिरवले.

दुसऱ्या दिवशी अपहरणकर्त्यांनी सोनाजी बोरुडे यांना फोन करण्यास भाग पाडून त्यांच्या घरच्यांना पाच लाखाची मागणी केली होती. आणि त्या मोबाइल नंबरच्या लोकेशन वरून शेवगाव पोलिसांनी बारामती पोलिस स्टेशनच्या हद्दीतून सापळा लावून आरोपींना त्यांना २४ तासात गजाआड केले. आरोपींमध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भगवान ठोसर, कैलास धरंधरे, जीवन करांडे, बाळासाहेब करांडे, ज्ञानेश्वर कांबळे यांचा समावेश आहे.

ही कामगिरी अहमदनगर पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक संदीप मिटके, शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आशिष शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान बडधे, पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव डमाळे, चालक पोलीस नाईक संभाजी धायतडक, यांनी केली.