आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआलमगीर येथून आर्थिक व्यवहारातून अपहरण झालेल्या व्यक्तीची भिंगार पोलिसांनी अवघ्या तासाभरात सुटका केली आहे. या प्रकरणी अथर हुसैन बोहरी (वय ३३, रा. फुलारी टॉवरजवळ, आलमगीर) यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.अंजुम बाबासाहेब सय्यद, फैजान जहागिरदार, अश्पाक बाबसाहेब सय्यद, इरशाद बाबासाहेब सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पथकाला तपासासाठी रवाना केले होते. अपहृत व्यक्तीला वडारवाडी (भिंगार) येथे एका खोलीत डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने वडारवाडी येथे शोध घेतला.
तेथे दोघे आढळून आले. सोहेल अथर हुसैन बोहरी याने मला तसेच माझ्या घरच्यांना मारहाण करून, मला बळजबरीने रिक्षा मधून आणत डांबून ठेवले व मारहाण केल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अथर हुसैन बोहरी याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकाँ पी. ए. बारगजे करत आहेत. पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शिशिरकुमार देशमुख, विलास गारूडकर, भानुदास खेडकर, राहुल द्वारके, अमोल आव्हाड, अरूण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.