आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटबंधारे:पाटबंधारे विभागाने मारले, पण वरुण राजाने तारले

श्रीरामपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन व कपाशीसह खरीप पिकांचे अस्तित्व धोक्यात आले होते. सध्या भंडारदरा व निळवंडे धरणातून पाटाला ओव्हरफ्लोचे पाणी चालू आहे.हे पाणी पिकांसाठी सोडावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली होती मात्र पाटबंधारे विभागाचे लक्ष दिले नाही. मात्र शेवटी वरुणराजाने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

गेल्या अनेक आठवड्यांपासून पाऊस गायब झाला होता.त्यामुळे ऐन फुलात आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक धोक्यात आले होते.श्रीरामपुर तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने विहिरींची पाणी पातळीही वाढली नाही.मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सध्या ओव्हरफ्लोचे पाणी चालू आहे.पावसाने ओढ दिल्याने सदर पाणी खरीप पिकांना द्यावे तसेच गावातळी व बंधारे भरून घ्यावेत अशी मागणी होत होती.मात्र सर्वच राजकिय नेत्यांसह पाटबंधारे खात्याने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते.काही वर्षांपूर्वी ओव्हरफ्लो चे पाणी चाऱ्यांना व ओढ्यालवसोडले जायचे.त्यातून गावतळी व बंधारे भरून घेतले जायचे.आणि मग ओढ्यांद्वारे व चाऱ्यांद्वारे पाणी नदीला सोडले जायचे.

याकडे मात्र आता पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे. कोणीही राजकीय नेते याकडे लक्ष देत नाहीत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दरम्यान, बुधवारी रात्री तालुक्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.त्यामुळे सोयाबीनसह कापूस पिकाला जीवदान मिळाले आहे. काही दिवस पाऊस झाला नसता तर पिके वाया गेली असते.

आता तरी चाऱ्यांना पाणी सोडावे
सध्या नदीला पाणी चालू आहे.खाली जायकवाडी धरण भरलेले आहे.त्यामुळे चाऱ्या व ओढ्याना पाणी सोडावे. त्यातून गावतळी व बंधारे भरून घेता येईल.चाऱ्या व ओढ्यांद्वारे नदीला पाणी सोडावे, असे झाले तर विहिरी व बोअरला पाणी वाढेल.

अन्यथा उन्हाळा पाणीटंचाईचा ठरेल
यापुढे समाधानकारक पाऊस झाला नाही तर पाणी पातळी वाढणार नाही. त्यातही जर ओढेनाले आणि चाऱ्या वाहिल्या नाहीत तर पाणी विहिरींच्या तळाशीच राहील.असे झाले तर कांदा गहू व इतर रब्बी पिकेही धड येणार नाहीत. तर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाही जाणवणार आहे. आता पाणी असतांना त्याचा फायदा घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...