आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपी रोगाबाबतीत राज्य सरकारने ठोस पावले उचलावी:किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांची मागणी

अहमदनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लंपी स्किन आजाराने राज्यातील पशुधनाला विळखा घातला आहे. हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने प्रभावी उपाययोजना न केल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. शिवाय दुग्ध व्यवसाय कोलमडून पडू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने लंपीच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी रविवारी निवेदनाद्वारे केली आहे.

34 जनावरांचा मृत्यू

लंपी हा संसर्गजन्य आजार असल्याने राज्यातील पशुधन व दुग्ध व्यवसाय या आजारामुळे धोक्यात आला आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांमधील 218 गावे या आजाराने प्रभावित झाली आहेत. 34 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

हा आजार मोठ्या प्रमाणात संसर्गक्षम असल्याने प्रभावी उपाययोजना न केल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. शिवाय दुग्ध व्यवसाय कोलमडून पडू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने लंपीच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी रविवारी निवेदनाद्वारे केली आहे.

ने-आण करण्यास मनाई

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुधन मंत्री व कृषिमंत्री यांना किसान सभेच्या वतीने या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी किसान सभेचे डॉ. अजित नवले, डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे कि, राज्य सरकारने लंपी प्रभावित भागाला 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. जनावरांची नियंत्रित क्षेत्रात किंवा त्या क्षेत्राबाहेर ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

आजारग्रस्त जिवंत किंवा मृत जनावरांच्या संपर्कात आलेली वैरण नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. जनावरांचा बाजार, शर्यती, जत्रा, भरवण्यासही मनाई करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या उपायोजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. मात्र, केवळ एवढे करून भागणार नाही, याची जाणीवही राज्य सरकारने ठेवण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री व पशुधन विकासमंत्री यांच्या प्रमुख समन्वयातून लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टास्क फोर्स गठीत करावे, पशुधन विकास विभाग, महसूल विभाग व कृषी विभागाच्या समन्वयाने तालुकास्तरावर कृती दल गठीत करून प्रतिबंध व उपचार या दोन्ही पातळीवर काम करावे, ज्या भागात लंपी आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्या सर्व भागांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करावी, शेतकऱ्यांमध्ये विशेष जनजागृती करण्यासाठी तातडीने मनुष्यबळ तैनात करावे, अशा मागण्या किसान सभेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...