आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:तिसऱ्या फेरीअखेर कोल्हापूरचा सोहम आघाडीवर

पटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बुद्धिबळ संघटना, आखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा चेस सर्कल याच्या वतीने तसेच शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांच्यातर्फे सुरू असलेल्या तीन दिवसीय १६०० पेक्षा कमी मानांकित खेळाडूंसाठी बडीसाजन मंगल कार्यालय येथे ऑल इंडिया ओपन चेस बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या दिवस अखेर कोल्हापूरचा सोहम खासबरदार (१५८४), सोनी अथर्व (ठाणे), हर्षल पाटील (पुणे) हे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे तिसऱ्या फेरीत ३ ज्येष्ठ खेळाडू आघाडीच्या पटावर खेळत होते.

या स्पर्धेत रोमहर्षक सामन्यात पुण्याच्या भुवन शितोळे ११७२ मानांकन असलेल्या या खेळाडूने दुसऱ्या फेरीत नाशिकच्या हेमंत जोशी १५१६ मानांकित यांचा पराभव करून स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण १३८ आतंरराष्ट्रीय मानाकिंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला. एकूण ३१५ सहभागी स्पर्धकांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ८४ खेळाडूनी सहभाग नोंदवला.

अहमदनगर जिल्हा चेस सर्कलतर्फे प्रथमच अखिल भारतीय १६०० पेक्षा कमी मानांकित खेळाडूंसाठी बडीसाजन मंगल कार्यालय येथे स्पर्धेचे उद्घाटन राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन करण्यात आले. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात राज्यातून व राज्याबाहेरील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पंच म्हणून प्रवीण ठाकरे (जळगाव), सागर गांधी (जामखेड), प्रीती समदानी (औरंगाबाद), पारूनाथ ढोकळे (नगर), सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, श्याम कांबळे विद्याधर जगदाळे, संजय खडके, देवेंद्र ढोकळे, चेतन कड, प्रकाश गुजराथी, अनुराधा बापट, डॉ. स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे हे काम पाहत आहेत.

या स्पर्धेतील विजेत्यांना ३१ हजार रुपयांची रोख पारितोषिक मिळणार असून नऊ वर्षांखालील खेळाडूंना, महिलांना, जेष्ठांना व विनामानांकित खेळाडूंना सुध्दा रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक गटात उतेजनार्थ पाच करंडक सुद्धा देण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...