आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिमानास्पद:प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोमल, कीर्ती, प्रेम, आदित्य नव्वदीपार

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलांचे कोरोनात निधन झाल्यानंतरही अरणगाव ते नगर सायकलवर प्रवास करून जिद्दीने शिक्षण घेणारा प्रेम अशोक पवळे याने ९२ टक्के गुण मिळवले. तसेच वांबोरी येथील सर्वसामान्य घरातून जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या शेतमजूर आईचा पुत्र आदित्यनेही ९२.८० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. शहरातील भुतकरवाडी परिसरात वडापावची गाडीवर कुटुंब चालवणाऱ्याची कन्या किर्तीने ८९ टक्के गुण मिळवून यश संपादन केले.

प्रेम अशोक पवळे या अरणगाव येथील विद्यार्थ्याच्या वडीलांचे कोरोना कालावधीत निधन झाले, आर्थिक स्थिती बिकट असतानाही तो जिद्दीने शिक्षण घेत राहिला. अरणगा ते नगर येथील श्रीकांत पेमराज विद्यालय हे आठ किमीचे अंतर तो सायकलनेच येत होता. कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास करून त्याने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले.

वांबोरी येथील आदित्य बाबासाहेब धनवडे याची आई शेतमजूर असून वडील खासगी कंपनीत कंत्राटीतत्त्वावर काम करून कुटुंब चालवतात. अत्यंत प्रतिकूल परीक्षेत आदित्यने चमकदार यश मिळवून ९२.८० टक्के गुण मिळवले. महेश मुनोत विद्यालयातील हा विद्यार्थी आहे. नगर येथील केशवराव गाडीलकर विद्यालयात शिक्षण घेणारी कीर्ती व्यास सामान्य कुटुंबातील असून तिने जिद्दीच्या जोरावर ८९ टक्के गुण मिळवले. तिचे वडील भुतकरवाडी परिसरात वडापावची गाडी चालवतात. तिच्या यशानंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना तिच्या वडिलांनी मुलीच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान व्यक्त करून पुढे शिकवणार असल्याचे सांगितले.

एका गाडी चालकाची कन्या कोमल रमेश सत्रे हिने ९२.६० टक्के गुण मिळवले. कोमल म्हणाली, कुटुंबातून मोठे बळ मिळाले, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे, भविष्यात जिल्हाधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे. त्यानुसार मी आतापासून तयारी सुरू करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...