आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोपरगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ मर्यादित संस्थेच्या निवडणुकीत काळे गटाचा धुव्वा उडवून कोल्हे गटाने विजयाचा गुलाल उधळत नववर्षाची विजयी सुरवात केली.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली प्रगती विकास मंडळाचे सर्वच्या सर्व ११ सदस्य बहुमताने विजयी झाले. तब्बल ४० वर्षांनी झालेली ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यात कोल्हे गटाने बाजी मारत, सरस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- सर्वसाधारण जागा-गुरसळ संजय किसन (३४९),चव्हाण दादासाहेब सखाहरी (३४३),चव्हाण भिकाजी गोकुळ (३३२), पगारे दत्तात्रय विठ्ठलराव (३४१), वक्ते कर्णासाहेब रामचंद्र (३४६), वक्ते कोंडीराम संपत (३४३).महिला राखीव-पगारे शैला उमेश (३४७), शिंपी रजनी फकिरा (३३१). अनुसूचित जाती-जमाती- गायकवाड दीपक सीताराम (३४२), इतर मागास प्रवर्ग- पगारे सुरेश अंबादास (३६५), भविजा/जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी - फटांगरे नामदेव कारभारी (३६१).प्रगती विकास मंडळ पॅनेलचे अध्यक्ष मधुकर वक्ते, शिवाजी वक्ते, भीमराव वक्ते, बाळासाहेब वक्ते, शरद थोरात, सतीश आव्हाड, विठ्ठल आव्हाड, आनंदा चव्हाण, तुळशीदास पगारे, दीपक गायकवाड, आनंद चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, बाजीराव वक्ते, फकिर शिंपी, भीमा संवत्सरकर, संजय होन, मिलन चव्हाण, जालिंदर चव्हाण आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.