आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Kopargaon | Murder | Marathi News | In Kopargaon, A Youth Was Brutally Killed By An Iron Rod During The Day In The Weekly Market; An Atmosphere Of Fear In The Area

कोपरगाव हादरले:कोपरगावमध्ये आठवडी बाजारात भरदिवसा लोखंडी रॉडने तरुणाची निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण

कोपरगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगावमध्ये भरदिवसा एकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 7 ते 8 जणांनी लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचुन तरुणाची हत्या केली आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज कोपरगाव शहराचा आठवडी बाजार होता. त्यामध्ये हा प्रकार घडला असून, यात राजा भोसले याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दररोज प्रकारे सोमवारीदेखील कोपरगाव शहराचे आठवडी बाजार होते. आजूबाजूच्या गावातील अनेक नागरिक बाजार करण्यासाठी कोपरगावात येत असतात. शहाराच्या अगदी मध्यभागी बाजार असुन, या बाजारातच राजू भोसले यांची 7-8 टोळक्यांनी मिळून लोखंडी रॉड तसेच दगडाने राजावर वार केला. त्यानंतर तो रक्तबंबाळ झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला संत जनार्धन स्वामी रुग्णालयात नेले असता, तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मृत राजा भोसले हा शिंगणापूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...