आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:कोपरगाव पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्या उद्घाटन; उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची उपस्थिती, 112 निवासस्थानांचेही लोकार्पण

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी येथील ११२ निवासस्थाने व कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन बुधवारी (६ एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. जिल्ह्यात गृह खात्याच्या वतीने पोलिसांसाठी घरकुलांचा उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत शिर्डी येथे ११२ निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे, आमदार राधाकृष्ण विखे, पोलिस महासंचालक रजनिश सेठ, गृहनिर्माण मंडळाचे पोलिस महासंचालक विवेक फणसळकर, नाशिक विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्वाती भोर आदी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...