आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणत्याही विकासकामासाठी तांत्रिक मान्यता अत्यंत महत्त्वाची असते. ५ नंबर साठवण तलावाला ज्यावेळी तांत्रिक मान्यता मिळाली, त्यावेळीच साठवण तलावाचे काम होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. फक्त प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा होते. अधिवेशनात ५ नंबर साठवण तलावासाठी १३१.२४ कोटी रुपये निधीची प्रशासकीय मंजुरी आघाडी सरकारकडून मिळवली. ‘ये तो अब झ्याकी आहे, असे सांगत कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सुतोवाच श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव शहरातील साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळवून आणल्याबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार काळे म्हणाले, माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात ४ नंबर साठवण तलावासाठी २ कोटी निधी आणला. मात्र, काम होऊ शकले नाही. कोपरगाव शहरात पिण्याचे पाणी साठवण्यासाठी प्रत्येक घरासमोर दिसणाऱ्या पाण्याच्या टाक्या स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्यातून महाविकास आघाडी सरकारकडून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळवली. याप्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष विजय बंब, उद्योजक कैलास ठोळे, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, डॉ. अजय गर्जे, महाराष्ट्र राज्य लिनेस क्लबच्या बहुप्रांतिक अध्यक्ष डॉ. वर्षा झवर, सुधा ठोळे, कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष शंतनू धोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडियाल, माजी गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, भरत मोरे, डॉ. तुषार गलांडे, डॉ. अतिष काळे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, प्रसाद नाईक, राजेंद्र बंब आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अॅड. विद्यासागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रमेश गवळी यांनी केले. आभार शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.