आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'लालकिल्ल्यावर फडकणारा तिरंगा ध्वज, त्यानंतर पाकिस्तानसारखा हिरवा ध्वज फडकावल्याचा व्हिडिओ व त्याखाली 'एक घंटे का काम हो जाएगा', असे प्रक्षोभक वाक्य असलेला आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याप्रकरणी नगरच्या एका युवकावर कोतवाली पोलिस ठाण्यात राष्ट्रीय सन्मानाच्या अप्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाचे संयोजक कुणाल सुनील भंडारी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
अदनान आयाज सय्यद (वय 21, रा.कोतवाली पोलिस स्टेशनजवळ, नगर) असे आरोपीचे नाव आहे. आशा टॉकीज परिसरातील युवकाने आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवला होता. लालकिल्ल्यावर तिरंगा फडकत असलेल्या या व्हिडिओत तिरंगा ध्वजाच्या जागेवर पाकिस्तानसारखा हिरवा झेंडा दाखवून 'एक घंटे का काम हो जाएगा' अशी प्रक्षोभक पोस्ट करण्यात आली होती. 10 जून रोजी रात्री याची माहिती मिळताच बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी याबाबत कायदेशीर माहिती संकलित केली व सोमवारी कोतवाली पोलिसात धाव घेऊन हा प्रकार निदर्शनास आणला.
टॉकीज परिसरातून ताब्यात
कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी तातडीने याची दखल घेत सदर स्टेटस ठेवणाऱ्या युवकास ताब्यात घेण्याचे आदेश दिले. विष्णू भागवत, रवी टकले, सागर निपसे, सुमीत गवळी, दिपक रोहोकले, तानाजी पवार, सुजय हिवाळे, संतोष गोमसाळे, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, गणेश धोत्रे, सागर पालवे यांच्या पथकाने आशा टॉकीज परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात कुणाल भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी कलम 153 (अ), 505 (2), राष्ट्रीय सन्मानाच्या अप्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियम 1971 च्या कलम 2 व 3अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी अदनान आयाज सय्यद याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे हे करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.