आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील परिस्थिती पाहता शेतकऱ्यांचे पैसे देऊनही ऊसतोडणीसाठी झालेले हाल लक्षात घेता शेतकऱ्यांनी पुन्हा कपाशी पिकाकडे आपला मोर्चा वळवला आहे. आहे. त्यानुसार वाढती मागणी पाहता तालुक्यातील अनेक ठिकाणी कृषी सेवा केंद्र दुकानदारांनी शेतकऱ्यांना वाढीव भावात कपाशी बियाणांची विक्री सुरु केली आहे. कृषी सेवा केंद्र धारकांनी शेतकऱ्यांना लुटणे बंद करावे, अशी मागणी जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे यांनी केली आहे. याबाबत अॅड. काकडे यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी तालुका कृषी अधिकारी ए. एल. टाकले यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र धारकांनी लुटणे बंद करावे हि शेतकऱ्यांनी होणारी लुट थांबवून शेतकऱ्यांना शासकीय दराने कपाशी बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत आपण आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा जनशक्ती मोठ्या प्रमाणात आंदोलनाची भूमिका घेईल. यावेळी जनशक्तीचे उद्योग विकास आघाडीचे अध्यक्ष अशोकराव ढाकणे, अकबर शेख, शिवाजी कणसे, ऋषिकेश वाघ, लक्ष्मण घोंगडे, करीम पठाण, दिपक भिसे, सुनील जऱ्हाड, अंबादास जऱ्हाड, संभाजी चेडे, दादासाहेब गरगडे, प्रकाश चेडे, दत्तात्रय चेडे, आदी उपस्थित होते. या वर्षी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस पिकाकडे तोंड फिरवले असून बहुतेक शेतकरी यांचा कपाशी लागवडीकडे कल दिसत आहे. म्हणून काही ठिकाणी लगेच कपाशीची कृत्रिम टंचाई दुकानदार पुढे करत आहेत. तर काही दुकानदार जास्तीच्या दराने कपाशी बियाणे विक्री करत आहेत. त्यामुळे कपाशी बियाणे शेतकऱ्यांना मूळ किमतीमध्येच मिळावे व बियाणांचा काळाबाजार होणार नाही याची आपल्यास्तरावर दक्षता घ्यावी. अन्यथा जनशक्ती विकास आघाडी या विषयावर मोठ्याप्रमाणात आंदोलनाची भूमिका घेईल, असेही निवेदनात म्हंटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.