आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांना हवे असणारे तंत्रज्ञान देण्यात बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राचे काम महत्त्वपूर्ण राहिले आहे. जैव तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि गट संघटन याद्वारे कृषी क्षेत्रात सुरू असलेले काम आंबा उत्पादकांसाठी दिशा दर्शक ठरेल. शेती तंत्रज्ञान, पुरक व्यवसाय आणि रोजगार निर्मीतीमध्ये काम करतांना शेतकऱ्यांसाठीचे हे केंद्र देशात अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी व्यक्त केले.
बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्रात कृषी विभाग, बायर, कृषि पणन मंडळ, नाबार्ड, प्रवरा फळे भाजीपाला सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सव, कृषि प्रदर्शन, आंबा पीक परिसंवादाचे उदघाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनी विखे, नाबार्डचे समन्वयक शितलकुमार जगताप, कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, डॉ. शरद गडाख, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, बायरचे मनोज सुर्यवंशी, बी. डी. जरे, स्वप्निल पाटील, पणन मंडळाचे चंद्रशेखर बारी, आंबा उत्पादक संघाचे डॉ. भगवानराव कापसे, माजी सभापती बबलू म्हस्के, सरपंच स्मिता चेचरे, सरपंच विमल म्हस्के उपस्थित होते.
शालीनी विखे म्हणाल्या, नाशवंत भाजीपाला आणि फळांची नासाडी यावर संशोधन होण्याची गरज आहे. शेतीपुरक व्यवसायास गती देण्यासाठी आणि सेंद्रीय शेतीसाठी हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ. सुजय विखे पाटील हे नेहमीचं शेतकऱ्यांसोबत राहून त्याचे प्रश्न सोडवत असतात. पाच दिवस चालणाऱ्या कृषि प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ ध्यावा असे आवाहन केले. म्हस्के म्हणाले, आंबा पिकात अधिक संशोधन व्हावे. प्रास्ताविक प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर यांनी, सुत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.