आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:खंडीत विजेमुळे कुकाणे व भेंडेकर वैतागले ; ग्राहकांचा आंदोलनाचा इशारा

कुकाणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुकाणे व भेंडे येथे पावसाळा सुरू झाल्यापासून गावठाण वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. सततच्या खंडित वीज पुरवठ्याने व्यापारी व घरगुती वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. वेळोवेळी तक्रार करून ही वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्राहकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नेवासे तालुक्यातील भेंडे वीज उपकेंद्रातून भेंडे बुद्रुक,भेंडे खुर्द,गोंडेगाव सह इतर गावांना स्वतंत्र गावठाण वीज वहिनी मार्फत घरगुती वीज पुरवठा केला जात आहे. तातडीचा बिघाड अथवा वीज उपकेंद्राला होणारा वीज पुरवठा खंडित झालेच्या कारणाशिवाय इतर वेळी अखंडित वीज पुरवठा व्हावा हा स्वतंत्र गावठाण वीज पुरवठा योजनेचा हेतू आहे. मात्र भेंडे वीज उपकेंद्र याला अपवाद असल्याचे दिसून येत आहे. उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना वाऱ्याची लहानशी झुळूक आली किंवा पावसाचे चार थेंब पडण्याचे कारणही ही गावठाण वीज पुरवठा खंडित करण्यास पुरेसे ठरत आहे.वीज वाहिनी मधील बिघाड झाल्याचे कारण पुढे करून बारा-बारा, चौदा-चौदा तास वीज पुरवठा बंद ठेवला जात आहे. आदल्या दिवशी सायंकाळी ५/६ वाजता बिघाडामुळे वीज पुरवठा बंद झाला तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत बंदच रहातो, त्याचे कारण म्हणजे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष. महावितरणचे अधिकारी-कर्मचारी सदैव नॉट रिचेबल असतात,रीचेलब असले तरी फोन घेत नाहीत, घेतला तरी काम चालू आहे, येईल, असे उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. भेंडे गावठाणचा वीज पुरवठा खंडीत वेळी-अवेळी होत असल्याने ग्राहक त्रासले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा हा खेळखंडोबा सुरू आहे. ऐन धंद्याच्या वेळी वीज गायब होत असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. सध्या शाळा, कॉलेजेसकडून ऑनलाइन वर्ग सुरू झालेले आहेत. अद्यापही अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ कायम आहे. अशात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. केवळ देखभाल, दुरूस्ती अभावी हा बिघाड वारंवार होत आहे. हा बिघाड कायम स्वरूपी दूर करावा अन्यथा कोणती ही पूर्वसूचना न देता महावितरण विरुद्ध आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...