आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारभावाची स्पर्धा:कुकडी कारखाना 2500 रुपये पहिला हप्ता देणार ; माजी आमदार राहुल जगताप यांची माहिती

श्रीगोंदे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल जगताप यांनी कुकडीचा पहिला हप्ता २५०० रुपये जाहीर करून दहा लाख टन गाळपचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र जिल्ह्यात बाजारभावाची स्पर्धा करणार असून शेवटचे टिपरू गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही, असे जगताप यांनी सांगितले.

श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे स्वर्गीय कुंडलिकराव जगताप यांनी लमाण बाबाच्या माळरानावर कुकडी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. श्रीगोंदे तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना व ऊस उत्पादकांना न्याय देण्याचे काम केले. तात्या असताना त्यांनी देखील बाजार भावाची स्पर्धा केली होती. पारदर्शक पद्धतीने कारभार करत गोरगरिबांचे प्रपंच उभे केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल जगताप यांनी कारखान्याचा कारभार पारदर्शकतेने चालवला आहे. तसेच जिल्ह्यात त्यांनी बाजारभावातही स्पर्धा करून चालू वर्षी दहा लाख गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील कार्यक्षेत्रात सर्वसामान्य, गोरगरीब शेतकऱ्यांचे शेवटचं टिपरू गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही, असेही माजी आमदार राहुल जगताप यांनी सांगितले. कारखान्याचा हंगाम यशस्वी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विवेक पवार, काारखान्याचे संचालक जालिंदर निंभोरे, संभाजी देवीकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...