आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी विद्यार्थ्यांसाठी कुलगुरु का कट्टा ऑनलाईन उपक्रम

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरिता आरोग्य विद्यापीठातर्फे ‘कुलगुरु का कट्टा’ ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमास प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख, होमिओपॅथी विद्याशाखेचे डॉ. धनाजी बागल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे व विद्यार्थी उपस्थित होते.

मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी ‘मानस अॅप’ कार्यरत केले आहे. विद्यार्थ्यांनी निरोगी व आनंदी राहण्यासाठी, तसेच मानसिक आरोग्याची समस्या लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामध्ये केलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...