आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:महामार्ग दुरुस्तीसाठी लंके उपोषणावर ठाम

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण -निर्मळ व नगर -मनमाड महामार्गाच्या कामासाठी आमदार निलेश लंके उपोषणावर ठाम असून, बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण -निर्मळ व नगर- मनमाड रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे काम सुरू करावे या मागणीसाठी चार दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना आमदार निलेश लंके यांनी भेटून उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर मंगळवारी (६ डिसेंबर) ला आमदार लंके यांनी पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना लंके म्हणाले, कल्याण -निर्मळ व नगर -मनमाड महामार्गाची अवस्था कठीण झाली आहे. कल्याण -निर्मळ रस्त्यावर आतापर्यंत ४०० जणांचे बळी गेले आहेत. महामार्ग प्रशासनाकडून या रस्त्याची दुरुस्ती होत नाही.

हा रस्ता दुरुस्त होत नसल्याचा निषेधार्थ बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे असे त्यांनी सांगितले.मिंडावरील कारवाईचा अहवाल मागवला सुपा औद्योगिक वसाहतीतील मिंडा या उद्योगावर महसूल विभागाने केलेल्या दंडात्मक कारवाईनंतर अनेक अडचणी या उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या आहेत. यापूर्वीच याबाबत जिल्हाधिकारी भोसले यांच्याशी चर्चा झाली आहे. या कारवाईचा अहवाल डॉ. भोसले यांनी मागवला आहे असे लंके यांनी सांगितले.

कल्याण रस्त्याचे काम सुरू; मे अखेर पर्यंत पूर्ण होणार
आमदार निलेश लंके यांनी उपोषणाचा इशारा दिला नंतर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम बंद झाले होते. सोमवारपासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एप्रिल, मे महिन्यात अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल असा दावा उपअभियंता स्मिता पवार यांनी मंगळवारी केला.

बातम्या आणखी आहेत...