आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयी विश्व तिरंगा प्यारा:नगरच्या गांधी मैदानात सामूहिक राष्ट्रगीत गायन; शहरातून काढली दुचाकी रॅली

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त "महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या" निर्णयानुसार बुधवार (17 ऑगस्ट) अहमदनगर शहरातील गांधी मैदान येथे समूह राष्ट्रगीत गायन पार पडले. यात विद्यार्थी, शिक्षक पालकांसह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दुचाकी रॅली काढण्यात आली

दरम्यान 75 ठिकाणी सार्वजनिक भोंग्या द्वारे एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन प्रसारित करण्यात आले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालयीन विभागाच्या वतीने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त अहमदनगर शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

विद्यार्थ्यांसह पालकांनी केली गर्दी

गांधी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समूह राष्ट्रगीत गायनासाठी सकाळपासूनच गांधी मैदान परिसरात नागरिक, पालक गर्दी करताना दिसून येत होते. श्री मार्कंडेय विद्यालय व प्रगत विद्यालयातील शिक्षक व पालक यांनी यात सहभाग नोंदवला होता. राष्ट्रगीत हे गायन सर्वांना म्हणण्यासाठी सर्व 75 ठिकाणी सार्वजनिक भोंग्या द्वारे एकाच वेळी प्रसारित करण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी 1 मिनिट जागेवर उभे राहून राष्ट्रगीत म्हणून या अभियानात सहभागी घेतला.

राष्ट्रगीत गायनाला उस्फूर्त प्रतिसाद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजप सह सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, भाजपचे शहराध्यक्ष भैया गंधे, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, प्रगत महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित, श्री मार्कंडे विद्यालयाचे उपप्राचार्य पांडुरंग गोणे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे ,सचिन पारखी,किशोर बोरा, वसंत लोढा, अजय चितळे प्रशांत मुथा, गोपाल वर्मा, बंटी डापसे, गौतम कराळे, विलास नंदी, गौतम कुलकर्णी ,महावीर कांकरिया शशिकांत देशमुख यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालयीन विभागाच्या वतीने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त अहमदनगर शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रगीत गायन करण्यात आले होते.त्याला देखील मोठा प्रतिसाद नागरिकांचा मिळाला.

बातम्या आणखी आहेत...