आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:दिवंगत गोपीनाथ मुंढे यांचे विचार दिशादर्शक ; पिचड

अकोले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी केंद्रीय मंत्री व राज्याचे भूतपूर्व उपमुख्यमंत्री भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांच्या पश्चात त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत. त्यांच्या आदर्श व विचारांचा पुरस्कार करून त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम तरूण पिढीने करावे, असे आवाहन भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.

स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त राजूरकर ग्रामस्थ व वंजारी समाजाच्यावतीने राजूर येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित विशेष कार्यक्रमात पिचड बोलत होते. यावेळी अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता देशमुख, राजूरचे माजी सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच संतोष बनसोडे, माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे, भास्कर येलमामे, संतोष मुतडक, काशिनाथ भडांगे, राजेंद्र वाघ, शेखर वालझाडे, प्रमोद लहामगे, सचिन मुर्तडक, योगेश बारहतेे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...