आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम:शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी साहित्य वाटपाचा उपक्रम स्तुत्य; ​​​​​​​ आयुक्त डॉ.पंकज जावळे

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील प्रत्येक घटकांला बरोबर घेऊन त्यांची उन्नत्ती प्रगती करण्याचे काम आपणा सर्वांना एकत्रितपणे करावयाचे आहे. प्रत्येकाने जर मनात ठरवले तर समाजातील दु:ख कमी होऊ शकते. त्यामुळे दैनंदिन कामकाजाबरोबरच सामाजिक उपक्रमात आपण योगदान दिले पाहिजे. मराठा संघ व मराठा पतसंस्था समाजातील प्रत्येक घटकांसाठी कार्य करत आहे. आजच्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा केलेला प्रयत्न हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केले.

मराठा सेवा संघ व जिल्हा मराठा नागरी सेवा पतसंस्थेच्यावतीने सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त रेल्वे स्टेशन मनपा शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना १००० विद्यार्थ्यांना व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. जावळे, अतििरक्त आयुक्त प्रदीप पठारे, कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सुरेश इथापे, अभियंता सायली पाटील, उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे, पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी, जिल्हा कोषागर अधिकारी भाग्यश्री भोसले, मनपा लेखा परिक्षक विशाल पवार, सावलीचे नितेश बनसोडे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, तालुकाध्यक्ष श्रीकांत निंबाळकर, प्रा.पोपटराव काळे, उदय अनभुले, संभाजी पवार, भाऊसाहेब थोरात, श्री.दवंगे, अमोल लहारे, अशोक वारकड, अनुराधा येवले, मनिषा शिंदे, संपुर्णा सावंत, महाडिक, मनोज पारखे, राजेंद्र ढोणे, बबन सुपेकर आदि उपस्थित होते.

सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे म्हणाले, आजच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचण सोडवण्यास छोटासा हातभार लावला आहे. अशा सर्व उपक्रमांसाठी इंजि.पुरुषोत्तम खेडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले.याप्रसंगी प्रदीप पठारे, मनोज ढोकचौळे, सायली पाटील, ज्योती गडकरी, आदिंनीही मराठा सेवा संघ व मराठा पतसंस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेले उपक्रम सर्वांसाठी दिशादर्शक असेच आहे. या कार्यात आम्हीही सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले.सूत्रसंचालन अनुराधा येवले यांनी, तर आभार व्हाईस चेअरमन सतीश इंगळे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...