आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:विद्यार्थ्यांच्या लेखनास डिजिटल व्यासपीठ, श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ई मॅगझीनची सुरुवात

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल व मोहनलाल रामावतार मानधना ज्यु. कॉलेजमध्ये एक्सप्रेशन या इ मॅगझीनची सुरुवात करण्यात आली. यामधून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना देखील त्यांचे विचार मांडता येतील. त्यांच्या कलागुणांना प्रदर्शित करता येईल व इतरही माहिती मिळेल. एक्सप्रेशन या इ मॅगेझिनच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन १५ मार्च रोजी ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ. शरद कोलते होते.

संस्थेचे सदस्य श्रीगोपाल जखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॅगझिन तयार करण्यात आले. एक्सप्रेशन हे इ मॅगेझिन असल्यामुळे प्रत्येकाला उपलब्ध होणे सहज शक्य आहे. प्रमुख पाहुणे महेंद्र कुलकर्णी यांनी या संकल्पनेचे स्वागत करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी आवाहन केले. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रात नुकसान झाले. इतर क्षेत्रातील नुकसान पुढील काही वर्षांत भरून येईलही. परंतु शैक्षणिक क्षेत्रात झालेले नुकसान भरून येणे कठीण आहे. शैक्षणिक क्षेत्रातील नुकसान भरपाई करण्यासाठी अश्या अनेक उपक्रमाची आवश्यक आहे, असे सांगितले. डॉ. शरद कोलते यांनी मॅगेझिनचे सल्लागार श्रीगोपाल जखोटीया यांचे विशेष अभिनंदन केले. मॅगेझिनच्या संपादक संपदा देशपांडे, सहसंपादक डेव्हिड साळवे व सुषमा उजागरे, टेक्निकलसाठी नितल मेहेर व अंकिता परदेशी या सर्व टीमचे कौतूक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका जेऊरकर यांनी शुभेच्छा दिल्या. आभार मागेझिनच्या संपादक संपदा देशपांडे यांनी मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झंवर, मोहनलाल मानधना, राजेश झंवर, अशोक बार्शीकर, जगदीश झालानी, रवींद्र गुजराथी, पुरुषोत्तम पटेल, लक्ष्मीकांत झंवर, रामसुख मंत्री, विष्णुदास सारडा, अरुण झंवर व श्रीकुमार सोनी उपस्थित होते. अध्यक्ष श्रीगोपाल धूत व बजरंग दरक यांनी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...