आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जिओ टॅगिंग, पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच ( एफटीके ) द्वारे तपासणी व त्याबाबतचे प्रशिक्षण घेण्यासाठी दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान ‘स्वच्छ जल से सुरक्ष’ अभियान राबवण्यात येणार आहे. गुरुवारी (1 डिसेंबरला) अभियानाचा शुभारंभ झाला.
जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या जल जीवन सर्वेक्षण 2023 चा भाग असणारे स्वच्छ जल से सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी सकाळी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. सांगळे म्हणाले, ग्रामीण भागात हे अभियान राबविले जाणार असून पाणी आणि आरोग्य याचा निकटचा संबंध आहे. ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज आहे. आपण ज्या गावातून आलो आहोत ,त्या ठिकाणी जरी आपण शुद्ध पाण्याबाबत आग्रह धरला,पाठपुरावा केला, तरी देखील मोठे काम होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन संनियत्रण व मुल्यमापन तज्ञ रविंद्र ठाणगे यांनी केले व आभार पाणी गुणवत्ता निरिक्षक योगेश सुतार यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी पाणी गुणवत्ता सल्लागार भागवत गोल्हार व जिल्हा कक्षातील सल्लागारांनी केले.
रासायनिक व जैविक एफ.टी.के किटद्वारे पाणी नमुने तपासणीबाबतचे प्रशिक्षण ऑक्टोप्स कंपनीचे प्रतिनिधी मनिष पाटील यांनी रासायनिक पाणी तपासणीचे एकुण अकरा पॅरामिटरमध्ये सविस्तर प्रात्यक्षित दिले. तसेच स्वयंसेवक एफ.टी.के महिला जल सुरक्षक यांचे WQMIS संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी तसेच WQMIS संकेतस्थळावर पाणी नमुना तपासणीचे नोंदी करण्याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले.
या अभियानांतर्गत हर घर जल या मोबाईल ॲपद्वारे अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठा योजना , रेट्रो फिटिंग मधील पाणी पुरवठा योजना व नवीन योजनेतील स्रोतांची जिओ टॅगिंग पूर्ण करणे, सर्व स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधी मधील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच सर्व पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. गावातील पाच महिलांना पाणी तपासणीचे प्रशिक्षण एफटीके किटद्वारे कशा पद्धतीने पाण्याची तपासणी करावी याबाबत गावातील पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.