आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामांडवे येथे पंचायत समितीचे माजी सभापती इंजिनियर प्रवीण कोकाटे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या पाण्याची टाकी करणे, पाईपलाईन करणे, बाके बसविणे व वैयक्तिक लाभाच्या योजनांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा झाला.
यावेळी काकासाहेब म्हस्के विद्यालयाचे संस्थापक डॉ. सुभाष म्हस्के व माजी पंचायत समिती सदस्य पोपटराव निमसे हे उपस्थित होते. मांडवे येथे माजी सभापती प्रवीण कोकाटे यांच्या पंधराव्या वित्त आयोग व स्थानिक विकास निधीतून दोन लाख रुपये खर्चातून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन, स्मशानभूमी परिसरातील पाण्याची टाकी, ६० सिमेंट बाकी बसवणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी ११ सायकल देणे, महिलांसाठी शिलाई मशीन, शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी व रबर मॅट देणे, अपंगांसाठी पिठाची गिरणी, रमाई योजनेच्या माध्यमातून घरकुल देणे, एमआरईजीएस च्या माध्यमातून केलेल्या विहिरी, गोठा काँक्रिटीकरण अशा विविध स्वरूपाच्या कामांचा शुभारंभ तसेच पूर्ण कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
डॉ. सुभाष म्हस्के, सरपंच सुभाषराव निमसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पोपटराव निमसे, उपसरपंच संजय निमसे, काकासाहेब म्हस्के विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय निक्रड, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन सुभाष रक्ताटे, सोसायटी चेअरमन पांडुरंग निमसे, सोसायटी संचालक पत्रकार ज्ञानेश्वर निमसे, विलास निमसे, जनार्धन गांगर्डे, मुख्याध्यापक गुंड, कल्याण ठोंबरे, खांदवे, आजिनाथ सासवडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष निमसे, अरुण निमसे, देविदास गांगर्डे, केशव निमसे, बाबासाहेब ढमाले, अंबादास निमसे, ईलाईबक्ष शेख, अशोक निमसे, संतोष निक्रड, चंद्रकांत निक्रड, मनोहर निमसे, दिलीप निमसे, भाऊसाहेब वाडेकर, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.