आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीची निवडणूक:पिंपळगाव पिसाच्या उपसरपंचपदी लक्ष्मण इथापे यांची बिनविरोध निवड

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात राजकीय दृष्टया प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव पिसाच्या उपसरपंचपदी लक्ष्मण बापूसाहेब इथापे यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामध्ये माजी आमदार राहुल जगताप गटाचे १० सदस्य व पंदरकर गटाचे ७ सदस्य घेण्यात आले होते. त्यांनतर सरपंच निवडीमध्ये राहुल जगताप यांचा गट व दिनकर पंदरकर यांच्या गटामध्ये मतभेद होऊन शाब्दीक चकमक झाली होती.

त्यावेळेस १० विरुध्द ७ अशा फरकाने माजी आमदार राहुल जगताप यांचे समर्थक सुर्यजित निवृत्ती पवार यांची सरपंच पदी निवड झाली होती आणि नागवडे कारखान्याचे संचालक बंडू पंदरकर यांचे बंधू किशोर पंदरकर यांचा पराभव झाला. तद्नंतर २ सप्टेंबर २०२२ रोजी उपसरपंच निवडीमध्ये माजी जिल्हा परीषद सदस्य दिनकर पंदरकर यांची सुन प्रियंका पंदरकर यांचेसह इतर ३ सदस्य गैरहजर राहिले व नागवडे कारखान्याचे संचालक बंडू पंदरकर यांचे बंधु किशोर पंदरकर यांच्या सह २ सदस्य हजर राहून उपसरपंच निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला. यावरुन पंदरकर यांनी उपसरपंच निवडणुकीत राहुल जगताप गटाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...