आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावना दुखावल्या:विरोधी पक्षनेते पवारांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन

कौठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्या बाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबाबत असे बेताल वक्तव्य करून सबंध हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा निषेध करत आहोत. पवार यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आला.

महिला मोर्चाच वतीने निषेध आंदोलनाच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आशा मुरकुटे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा सचिव मनीषा फुलारी, स्मिता काळे, सुरेखा काळे, लताबाई सोनवणे, सुरेखा काळे, गीता पारखे, पुजा पारखे डॉ.निर्मला सांगळे, मनीषा पतंगे, डॉ.विद्या कोलते बाळासाहेबांची शिवसेना तालुकाध्यक्ष मीरा गुंजाळ, माधुरी मावस्कर, सुनीता गायकवाड, निता वाघ, जयश्री कराळे,धनश्री वाघ, त्रिवेणी वालतुरे उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...