आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तृत्व स्पर्धा:पुढाऱ्यांनी एकजीव होऊन जनतेसाठी लढावे...; महाविद्यालयीन युवकांचे आवाहन, रुपाली गिरवले, कोमल औटे यांनी पटकावला फिरता करंडक

श्रीरामपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहेत,महागाई गगनाला भिडली आहे,युवकांना रोजगार नाही असे एक ना अनेक सामाजिक जनहीताचे प्रश्न ज्वलंत असतांनाही सध्या राजकीय स्वार्थासाठी ज्या काही राजकीय कुरघोड्या सुरू आहेत त्या विकासाला घातक आहेत. एकमेकांच्या जीवावर उठलेल्या राजकीय नेत्यांनी एकजीव होऊन जनतेच्या कल्याणासाठी लढावे, असे भावनिक आवाहन महाविद्यालयीन युवकांनी केले आहे.

बेलापूर शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर आणि कर्मयोगी मुरलीधर खटोड जनलक्ष्मी पतसंस्था बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी मुरलीधर खटोड जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत विविध विषयांवर ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष गणपतलाल मुथा, उपाध्यक्ष अशोक साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव अॅड.शरद सोमाणी विश्वस्त दीपक सिकची, राजेश खटोड, श्रीवल्लभ राठी, हरिचंद्र महाडिक, नंदूशेठ खटोड, बापूसाहेब पुजारी, प्रा. हंबीरराव नाईक, कर्मयोगी मुरलीधर खटोड, जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी अजय बोरसे,पोलिस ठाण्याचे अतुल लोटके, गणेश भिंगारदे, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे उपस्थित होते.

या स्पर्धेत अहमदनगर न्यू लॉ कॉलेजची रुपाली गिरवले आणि ज्ञानेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल औटे यांनी प्रथम क्रमांक मिळवून फिरता करंडक पटकावला. राहाता महाविद्यालयाची साक्षी भागवत द्वितीय,न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा प्रविण काजळे,तर योगिता कसबे (अशोकनगर महाविद्यालय), महेश उशीर (एसएसजीएम महाविद्यालय कोपरगाव), राजश्री आंधळे (गृह विज्ञान व संगणक महिला महाविद्यालय लोणी), योगेंद्र मुळे (के. जे. सोमय्या महाविद्यालय कोपरगाव), राजेश्वरी आंबेकर (जे. टी. एस. ज्यूनियर कॉलेज बेलापूर), वैष्णवी माकोणे (अशोकनगर महाविद्यालय), साक्षी भांबरे (सी. डी. जैन महाविद्यालय श्रीरामपूर), तनुजा गुडधे (लोकनेते बाळासाहेब थोरात महाविद्यालय तळेगाव दिघे), हर्षदा शिंदे ( जिजामाता महाविद्यालय भेंडा), अनुजा गाढे (न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली.

बातम्या आणखी आहेत...