आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र व राज्य शासनातील बोगस आदिवासी भरतीचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, सिटू, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून सरकारच्या कृतीचा धिक्कार करण्यासाठी जुन्नर (पुणे) येथे शुक्रवारी (२३ डिसेंबर) राज्यस्तरीय एल्गार परिषद आयोजित केली आहे. या परिषदेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यभरातील प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत, अशी माहिती माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
या परिषदेस अकोल्यातून सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर काकड, अनिता साबळे, निर्मला मांगे, दत्ता शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने एल्गार परिषदेस कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आदिवासींचे खोटे जमात प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी सरकारी नोकऱ्या बळकावल्यात.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची नोकरीतून हकालपट्टी करणे आवश्यक आहे. आदिवासींना संविधानाने आरक्षण दिले पण बोगस लोकांनी खोटे दाखले देऊन त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेऊन त्यांच्याच जागा बळकावणे गुन्हा आहे.राज्यात १२ हजार ५०० पदांवर बोगस लोकांना आदिवासी आरक्षणाचा लाभ दिला आहे. संघटना व जागरूक नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर यापैकी फक्त ३ हजार ४३ पदे रिक्त केली आहेत. रिक्त पदांपैकी केवळ ६१ पदे भरली. उर्वरित ९ हजार ४५७ पदे रिक्त आहेत. पदे भरण्याची कार्यवाही त्वरीत करण्याची केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.