आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीचे वातावरण:कांचनवाडी कोकमठाण परिसरात बिबट्याची दहशत

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरा नजीक बेटभागाच्या पलीकडे असलेल्या कांचनवाडी कोकमठाण परिसरात एका बिबट्याने गेल्या पंधरा दिवसापासून धुमाकूळ घातला असून आत्तापर्यंत पाच कुत्रे एक शेळी व इतर प्राण्यांचा त्याने फडशा पाडला. त्यामुळे शेतकऱ्यात व वाड्यावर भीतीचे वातावरण पसरले आहे.कांचनवाडी व नदीकाठच्या परिसरात या बिबट्याचे गेल्या पंधरा दिवसापासून वास्तव्य आहे. तो गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ वाजे दरम्यान आमच्या वस्तीजवळ आला एका कुत्र्याच्या मागे लागला होता हे पाहण्यासाठी प्राजक्ता शिंदे बाहेर गेल्या असता त्यांना या बिबट्याचे दर्शन झाले, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर अरविंद शिंदे अशोक शिंदे व इतरांनीही बाहेर आल्यानंतर त्याला हुसकवून लावले, त्याने आत्तापर्यंत पाच कुत्रे व शितोळे यांची शेळीची शिकार केल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

शिंदे कुटुंबीयांनी त्यांचा स्वतःचा जेसीबी घेऊन आत मध्ये बसून लाईटचे फोकस मारून त्याचा पाठलाग केला. त्याची छायाचित्रेही काढली मात्र त्यांनी धूम ठोकली, काटवनात जाऊन तो लपला. या मुळे या परिसरात मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून दिवसाही वस्तीच्या बाहेर पडण्यास कोणी धजावत नाही असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. याबाबत उपसरपंच दीपक रोहम यांच्या कानावर ही सर्व वस्तुस्थिती घातल्यानंतर त्यांनी वन विभागाशी व थेट मुंबई मंत्रालयापर्यंत संपर्क केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामे केले, मात्र बिबट्या बंदिस्त करण्यासाठी ते पिंजरा लावू शकले नाही. शेतकरी राजेंद्र जोशी भाऊसाहेब आव्हाड यांच्या वस्ती परिसरातही तो दिसल्याचे सांगण्यात आले. बिबट्यालाही हुसकवण्यासाठी फटाके व इतर वाद्य वाजवून त्याला पळून लावण्याचा प्रयत्न या परिसरातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान सरपंच रंजना दुशिंग उपसरपंच दीपक रोहम यांच्या सहीने वनविभागास त्वरित या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा म्हणून पत्र देण्यात आले आहे, दिनांक तीन रोजी पिंजरा लावू असे आश्वासन वन विभागाच्या वतीने देण्यात आले आहे . मात्र बिबट्याच्या दहशतीने गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरातील शेतकरी, नागरिक जागवून काढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...