आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डीत गेल्यानंतर आशियातील साईबाबांच्या सर्वात मोठ्या भोजन प्रसादालयात प्रसाद घेण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. रोज किमान ५० हजार भाविकांना येथे विनामूल्य प्रसाद भोजन दिले जाते. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत शेफ संजीव कपूर यांनी बुधवारी येथे भेट दिल्यानंतर आता येथील भोजन प्रसादातील भाज्या अधिक चविष्ट, चपात्या अधिक काळ नरम तर लाडवाचा गोडवा अधिक वाढणार आहे. साईबाबा संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त माजी आमदार जयवंत जाधव यांच्या पुढाकाराने संजीव कपूर यांनी प्रसादालयास भेट दिली व भोजन प्रसादाची गुणवत्ता अधिक कशी वाढवता येईल याबाबत धडे दिले.
प्रशासनही तातडीने या गोष्टी अमलात आणणार आहे. तसेच आपल्या सूचनानंतर प्रसाद भोजनाचा गोडवा किती वाढला याचा आढावा घेण्यासाठीही संजीव कपूर पुन्हा प्रसादालयाला भेट देणार आहेत. सामान्य भाविकांबरोबरच सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योजक, क्रिकेटर येथील भोजन प्रसादाचा लाभ घेतात. त्यामुळे त्याचा दर्जा अधिक चांगला कसा राहील यासाठी संस्थान सातत्याने प्रयत्न करते.
प्रसाद आणखी दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न करू
शेफ संजीव कपूर यांच्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल.लाडू प्रसाद अधिक दर्जेदार आणि भाविकांच्या पसंतीस उतरेल अशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करू.
-जयवंत जाधव, ज्येष्ठ विश्वस्त साई संस्थान
या केल्या सूचना
-भाजीपाला,गहू, कडधान्य, तांदूळ खरेदी करताना गुणवत्ता तपासा
-मसाले व खाद्यतेलाचा दर्जा चांगला ठेवा.
-भाज्या शिजवतानाच्या प्रक्रियेत थोडा बदल करा
-लाडू अधिक चविष्ट व टिकाऊ करण्यासाठी साजूक तूप व साखरेची गुणवत्ता कशी राखावी तसेच मोतीचूर लाडू व बंुदी एकसारखी ठेवण्यासाठी निर्मिती प्रक्रियेत बदल करावा.
एल वन टेंडर बंदचा निर्णय घ्यावा लागेल तज्ज्ञांच्या मते, संस्थानला भोजन व लाडू प्रसादासाठी भाजीपाला, कडधान्य, गहू , खाद्यतेल, गावरान तूप ,मसाले एल वन टेंडर घेऊनच खरेदी करावे लागतात. त्यामुळे प्रसादालयाला लागणाऱ्या मालाची गुणवत्ता मिळत नाही. जर गुणवत्ता अधिक राखायची असेल तर संस्थानला हे सर्व खुल्या बाजारातून खरेदी करावे लागेल. त्यासाठी एल वन टेंडर पद्धत बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.