आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारनेर:याला सरकार म्हणावे का? अण्णांचा मोदी यांना टोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करू, हे आपले शेवटचे आंदोलन : हजारे

पारनेर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, या मागणीसाठी आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मुलांनी रविवारी राळेगणसिद्धीत येत थाळीनाद आंदोलन केले. दिल्लीत आंदोलनास जागा मिळाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करू, हे आपले शेवटचे आंदोलन असेल, असे हजारे यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांचे समाधान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोनदा आंदोलन केले. मोदी सरकारने दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही. याला सरकार म्हणावे का? दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलिला किंवा जंतरमंतर येथे जागा मिळाली, तर या प्रश्नावर शेवटचे आंदोलन करेन, असे हजारे यांनी आंदोलकांना सांगितले.

पंकज प्रकाश श्रीवास्तव (बिहार), मोहित शर्मा (दिल्ली), राजरतन शिंदे, प्रदीप मेटी, किरणकुमार वर्मा, सतीशकुमार राज पुरोहित (कर्नाटक) या सहा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धीत प्रवेश करताच थाळीनाद सुरू केला. अण्णा भेटणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी थाळीनाद थांबवला. अण्णांनी तासभर त्यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकार आंदोलकांना विविध प्रकारे त्रास देत आहे. २२ जण आतापर्यंत शहीद झाले आहेत. हजारे सहभागी झाले, तर आंदोलनाची ताकद निश्चितच वाढेल. तुमच्याकडे संपूर्ण देश दुसरे गांधी म्हणून पहात आहे. तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहेत, अशी भावना शिष्टमंडळाने व्यक्त केली. त्यानंतर अण्णांनी आंदोलनात सहभागी होऊ, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...