आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शहर विकासासाठी एकत्र येऊन शहर विकसित करू; जगताप यांचे प्रतिपादन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गावठाण भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने ही सर्व कामे मार्गी लागून, शहर खड्डेमुक्त होईल. राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत आहेत. नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकास कामे मार्गी लावल्यानंतर ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येत नाही. शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रत येऊन विकसित शहर निर्माण करायचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून दीक्षित मंगल कार्यालय परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक प्रदीप परदेशी, संजय ढोणे, गौतम दीक्षित, उल्हास ढोरे, जयंत मुळे, राजेंद्र जोग,जितेंद्र भट्ट, हिरेन भट्ट, दिलीप भट्ट, मेहुल भट्ट, विजय दांडगे, देविदास जोग, बंटी देवसान, रवींद्र कुदळे, अक्षय गांधी, शुभम कासार, सुवर्ण पत्की आदी उपस्थित होते.ॲड. जाधव म्हणाले, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहोत प्रभागाचे नियोजनबद्ध विकास कामे सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...