आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वतंत्र ग्रामपंचायत झाल्याने ढोलेवाडी गावच्या विकासाला चालना मिळेल. ''सत्ता असो, वा नसो'' विकास कामांचा वेग कायम राखला. अडचणीचा काळ येतो, त्यातून मार्ग काढून पुढे जावू. विजय सत्याचाच असतो, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. ढोले लॉन्स येथे नवीन ढोलेवाडी ग्रामपंचायत स्थापनेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार थोरात बोलत होते.
रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, आबासाहेब थोरात, प्रतापराव ओहोळ, बाळासाहेब ढोले, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, अभिजीत ढोले, सुधाकर ताजणे, रामनाथ कुऱ्हे, दिलीप पवार यावेळी उपस्थित होते. आमदार थोरात म्हणाले, तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण सातत्याने काम केले. जनतेनेही कायम प्रेम दिले. गुंजाळवाडी व ढोलेवाडी ग्रामपंचायतसाठी ३४ कोटीची पाणीपुरवठा योजना राबवली. या माध्यमातून दोन्ही गावच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.
नागरिकांच्या मागणीमुळे ढोलेवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र केली. आता सर्वांनी गाव विकासासाठी जोमाने काम करावे. विकास कामांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार तांबे म्हणाले, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य असताना दोन्ही गावच्या विकासासाठी आपण काम केले. ढोलेवाडी शहरालगत असल्याने व स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्याने या परिसराचा विकास होईल. प्रास्ताविक थोरात कारखान्याचे संचालक अभिजीत ढोले यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पवार यांनी तर सुधाकर ताजने यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.