आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरचे आद्य पक्षी अभ्यासक रेव्हरंड सॅम्युएल बेकन फेअरबॅंक यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त निसर्ग मित्र मंडळाच्यावतीने रविवार दि. ११ डिसेंबर रोजी विद्यार्थी, निसर्गमित्र व हौशी नागरिकांसाठी चला घरटे बनवू या’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा शहरातील छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक ( हुतात्मा स्मारक), रेसिडेन्शिअल हायस्कूल समोर येथे सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये होईल. निसर्ग मित्र मंडळाचे संस्थापक तथा अहमदनगर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक प्राचार्य डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी ही माहिती दिली.\n निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना घरटे बनविण्यासाठी कागदी पाईप पुरविले जाणार असून विद्यार्थ्यांनी चप्पल/ बुटाचे रिकामे खोके, जुन्या वहीचे पुठ्ठे, खाकी चिकट टेप, कात्री, पाण्याची बाटली, खाऊ सोबत आणावा असे आवाहन आयोजकांतर्फे इंजि. रूषिकेश लांडे ,भैरवनाथ वाकळे, नंदकुमार देशपांडे, राहूल विळदकर, राजेश परदेशी, विलास पाटील, विजय देवचक्के, राजेंद्र प्रसाद स्वामी, अजिंक्य सुपेकर, हितेश ओबेरॉय, सुधेंद्र सोनवणे आदींनी केले आहे.
हे घरटे बनविल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी हे घरटे आपल्या घराच्या बंगल्याच्या आवारात लावणे अपेक्षित आहे, या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पक्षी अभ्यास, पक्षी निरीक्षण, पर्यावरण जागृती व निसर्गप्रेम वृध्दींगत होईल आणि या विषयी आवड निर्माण होईल, असा विश्वास निसर्ग मित्र मंडळाचे संस्थापक आणि अहमदनगर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.