आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागरी समस्यांबाबत दैनिक दिव्य मराठीच्या वतीने आयोजित 'रुबरू' अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर उपस्थित नगरसेवकांनी समर्पक उत्तरे देतानाच काही मुद्देही उपस्थित केले. प्रशासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
कार्यक्रमास स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, आसिफ सुलतान, दिपाली बारस्कर, मीना चव्हाण, निखिल वारे, बाळासाहेब पवार, सावेडी प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर आदी उपस्थित होते. प्रारंभी ‘दिव्य मराठी'चे ब्युरो चीफ अनिरुद्ध देवचक्के यांनी सर्वांचे स्वागत करून उपक्रमाची माहिती व संकल्पना स्पष्ट केली. भिस्तबाग, बोल्हेगाव, पाइपलाइन रोड, ढवणवस्ती, कजबे वस्ती, तपोवन रोड, मुकुंदनगर परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून समस्या मांडल्या. उपनगर परिसरात स्मशानभूमी, अग्निशमन केंद्राची गरज व्यक्त करत पाणी, रस्ते, अतिक्रमण आदी मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.