आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच सर्व समाज बांधवांना धार्मिक सामाजिक कार्यात मोठी मदत केली. तोच वसा आणि वारसा पुढे चालवताना सुतार, लोहार समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव येथे विश्वकर्मा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार काळे बोलत होते.
ते म्हणाले, कोपरगाव शहराच्या सर्वांगिण विकासाला चालना देऊन कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला असून ५ नंबर साठवण तलावाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर विविध समाजाच्या समाज बांधवांच्या मागणीनुसार सभा मंडासी कोट्टवी रुपयांचा निधी दिला असून सुतार-लोहार समाजाच्या सभा मंडासी देखील १० लाख रुपयांचा निधी दिला. इतर सभा मंडपाच्या कामाचे काम वेगाने सुरू असून सुतार-लोहार समाजाच्या सभा मंडपाच्या कामाची देखील निविदा प्रसिद्ध झाली असून यांनी लवकरच प्रत्यक्षात कामास प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढील काळात देखील सुतार, लोहार समाज बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी सोडवनार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भगवान विश्वकर्मा महाराजांचे दर्शन घेऊन सर्व समाज बांधवांना भगवान विश्वकर्मा जयंतीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उंडे महाराज, विजयराव जाधव, सूर्यकांत जाधव, दत्तात्रय क्षीरसागर, संजय दिवेकर, राजू कापडे, सुभाष क्षीरसागर, सुभाष दिवेकर, उमेश दीक्षित, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, संदीप कपिले, सचिन गवारे, संजय लोहारकर, अच्युत कडलग, विशाल आवारे, अनिकेत वाकचौरे, किरण सूर्यवंशी आदी मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.