आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस प्रमाणपत्र:बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी सीईओंना पत्र; झेडपीत दहा वर्षानंतर पुन्हा चर्चा

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यातून सुट मिळवण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे अहमदनगर जिल्हा परिषदेतील प्रकरण दहा वर्षांपूर्वी राज्यभर गाजले होते. आता पुन्हा एकदा आंतरजिल्हा बदलीच्या निमित्ताने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर झाल्याचा संशय व्यक्त करून प्रमाणपत्रांच्या चौकशीची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केली आहे. २०११-२०१२ वर्षांत बदल्यातून सुट मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. दिव्यांग नसतानाही खोटी प्रमाणपत्रे सादर करून सवलतीचा लाभ लाटल्यामुळे, खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत असल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा बनावट दिव्यांग प्रमाणपत्राप्रकरणी सारोळा कासारचे ग्रामस्थ अनिल धामणे यांनी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

धामणे यांनी म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याने खऱ्या दिव्यांग शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणी सारोळा कासारचे ग्रामस्थ अनिल माणिक धामणे यांनी केली आहे. त्यामुळे आता सीईओ येरेकर याप्रकरणी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...