आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:साडेतीन दशकांमध्ये 650 हून अधिक‎ महिला, युवतींची देहविक्रयातून मुक्तता‎

महेश पटारे | नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

असहाय महिला व युवतींना फसवून‎ किंवा बळजबरीने त्यांच्याकडून‎ वेश्याव्यवसाय करून घेण्याचे प्रमाण‎ जिल्ह्यात अधिक होते. ही कीड समूळ‎ नष्ट करण्याचा विडा स्नेहालय संस्थेने‎ उचलला आणि गेल्या ३४ वर्षांमध्ये‎ सुमारे ६५० हून अधिक पिडीत महिला‎ व युवतींची या देहविक्रयाच्या‎ व्यवसायातून मुक्तता केली. इतकंच‎ नाही, तर अनेक महिला व युवतींना‎ स्वाभिमानाने स्वत:च्या पायावर उभे‎ राहण्याची हिंमत देखील दिली आहे.‎ सुमारे ३५ वर्षांपूर्वी नगर शहरातील‎ चित्रा गल्ली व भगत गल्ली हे‎ लालबत्ती विभाग म्हणून ओळखले‎ जात. तब्बल ४५० ते ५०० महिला व‎ युवती या परिसरात फिरत‎ देहविक्रयाचा व्यवसाय करायच्या.‎ यात अल्पवयीन मुलींचाही मोठा‎ सहभाग होता. तसेच मुलांमध्ये अंमली‎ पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढले होते.‎ सामाजिक कार्यकर्ते गिरीश‎ कुलकर्णी व काही समविचारी मित्रांनी‎ या व्यवसायातील पीडित महिलांची‎ सुटका करण्यासाठी स्नेहालय संस्थेची‎ स्थापना केली.

मुक्तीवाहिनी टीम तयार‎ केली. लालबत्ती भागातील पीडित‎ महिलांची सुटका करण्यास सुरूवात‎ केली. त्यांना तात्पुरता निवारा‎ देण्यासाठी एमअायडीसी परिसरात‎ निवारा केंद्र स्थापन केले. कुंटणखाने‎ चालवणाऱ्या महिला, गुंड प्रवृत्तीच्या‎ विरोधात कायदेशीर लढा दिला. पिडीत‎ महिलांना सुरक्षा देणे, जनजागृती करणे‎ सुरू केले.‎ नगर शहरासह नाही, तर काेपरगाव,‎ राहाता, श्रीरामपूर, शेवगाव‎ तालुक्यातील कुंटणखानेही बंद पाडले.‎ देहविक्रयाच्या व्यवसायातून बाहेर‎ काढण्यासाठी महिलांनी स्वत:च्या पा‎ यावर उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे‎ स्नेहालयने पीडित महिला व युवतींच्या‎ पुनवर्सनाची जबाबदारी उचलली.‎ त्यांना शिधापत्रिका व आधार कार्ड‎ काढून दिले.‎ अनेकींना स्वत:चे उद्योग-व्यवसाय‎ सुरू करण्यासाठी सहकार्य केले. या‎ व्यवसायात नव्याने कोणी येऊ नये,‎ म्हणून वेळोवेळी लालबत्ती विभागात‎ पाहणी केली जाते. लालबत्ती‎ विभागातील दुसरी पिढी देहविक्रयाच्या‎ व्यवसायात येण्यापासून वाचवण्यात‎ स्नेहालयला यश आले आहे.‎

पीडितांच्या बालकांना शिक्षण‎
स्नेहालय दरवर्षी मे-जून महिन्यात‎ लालबत्ती विभागात पाहणी करून ५ वर्षे‎ पूर्ण झालेल्या मुलांना स्नेहालयाच्या‎ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल‎ करून घेते. अशा एकूण ३५० पैकी १५२‎ बालके एचआयव्हीग्रस्त आहेत. या‎ बालकांच्या आरोग्याची नियमित‎ तपासणी करून त्यांना आैषधोपचार‎ केले जातात.‎

हिंमतग्राममध्ये नांदतात कुटुंबं‎
देहविक्रयाच्या व्यवसायातून बाहेर‎ काढलेल्या, तसेच एचआयव्ही बाधित‎ असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाचे पुनर्वसन‎ करत स्नेहालयाने निंबळकजवळ हिंमतग्राम‎ वसवले आहे. तेथे पुनर्वसन केलेली ४०‎ कुटुंबं सध्या गुण्यागाेविंदाने नांदत आहेत.‎

पीडितांना केले सक्षम‎
देहविक्रयाचा व्यवसाय सोडू‎ इच्छिणाऱ्या महिलांना स्नेहालय घर‎ देते, तसेच पुनर्वसन करते. या‎ महिलांना फॅशन डिझायनिंग, मेहंदी‎ काढणे, मेणबत्ती तयार करणे,‎ भरतकाम, विणकाम,‎ शिवणकलेचे प्रशिक्षण देते. त्यामुळे‎ आतापर्यंत १७० महिला स्वत:च्या‎ पा यावर सक्षमपणे उभ्या राहिल्या.‎ केटरिंग, किराणा दुकाने,‎ वस्त्रदालनात मजुरी, तर काही‎ महिलांनी फळे-भाजीपाला‎ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.‎

‎तत्काळ माहिती कळवा‎
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक‎ कायद्यानुसार अल्पवयीन मुलींची‎ वाहतूक करणे गुन्हा आहे. कुठे‎ कुंटणखाना चालू असल्यास माहिती‎ कळवावी. पीडित महिला व युवतींची‎ या व्यवसायातून सुटका करण्यासाठी‎ स्नेहालय संस्था कटिबद्ध आहे.‎- प्रविण मुत्याल, संचालक, पुनर्वसन‎ प्रकल्प.‎

बातम्या आणखी आहेत...